भारताच्या आयकर कायद्यानुसार सर्व व्यक्ती, HUF, भागीदारी संस्था, LLP आणि कॉर्पोरेट्स यांनी कमावलेल्या उत्पन्नावर आयकर आकारला जातो. वैयक्तिक बाबतीत कर हा फ्लॅट रेटनुसार नाही तर आकारणी नुसार आकारला जातो. जर त्यांचे उत्पन्न किमान मर्यादेपेक्षा (मूलभूत सवलत मर्यादा म्हणून ओळखले जाते) असेल तर लोकांना कर विवरणपत्र भरणे आणि लागू कर भरणे आवश्यक आहे.व्यक्तींसाठी आयकर आकारणी तीन श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत - ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्ती, ६० ते ८० वयोगटातील व्यक्ती आणि ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती.चला तर या प्रत्येक श्रेणीवर एक नजर टाकूया.
बजेट २०२३ अपडेट : नवीन कर प्रणालीसाठी सुधारित उत्पन्न स्लॅब्स
उत्पन्न | आयकर दर |
---|---|
३,००,००० लाख रुपयेपर्यंत | शून्य |
रु . ३,००००० ते रु. ६,००००० | रु. ३,००००० पेक्षा जास्त उत्पन्नावर ५% |
रु . ६,००००० ते रु. ९,००००० | रु. ६,००००० पेक्षा जास्त उत्पन्नावर रु.१५००० + १०% |
रु . ९,००००० ते रु. १२,००००० | रु. ९,००००० पेक्षा जास्त उत्पन्नावर रु.४५००० + १५% |
रु . १२,००००० ते रु. १५,००००० | रु. १२,००००० पेक्षा जास्त उत्पन्नावर रु.९०,००० + २०% |
रु. १५,००००० च्या वर | रु. १५,००००० पेक्षा जास्त उत्पन्नावर रु.१५०,००० + ३०% |
१. आयकर आकारणी म्हणजे काय?
प्रत्येक करदात्यावर भारतीय आयकराच्या आकारणीनुसार कर आकारला जातो.आकारणी प्रणाली म्हणजे उत्पन्नाच्या विविध श्रेणींसाठी वेगवेगळे कर दर निश्चित करणे. याचा अर्थ जशी करदात्याच्या उत्पन्नात वाढ होईल त्याप्रमाणे कर दर वाढतील. अशा प्रकारच्या करप्रणालीमुळे देशात प्रगतीशील आणि निष्पक्ष कर प्रणाली सक्षम होतात. प्रत्येक अर्थसंकल्पात अशा प्रकारच्या आयकर स्लॅबमध्ये बदल होत असतात. करदात्यांच्या वेगवेगळ्या श्रेणींसाठी हे आकारणी दर वेगवेगळे आहेत.आयकर विभागामध्ये "वैयक्तिक" करदात्यांच्या तीन प्रकारच्या करप्रणालींचा समावेश आहे:
२. आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी आयकर आकारणी दर (मूल्यांकन वर्ष २०२३-२४)
अ. आर्थिक वर्ष २०२२-२३ ( मूल्यांकन वर्ष २०२३-२४), नवीन कर प्रणाली- ऐच्छिक का आहे?
नव्या कररचनेमध्ये करदात्यांना निवडण्याचा पर्याय आहे:
आर्थिक वर्ष २०२२-२३ (मुल्याकंन वर्ष २०२३-२४) साठी आयकर आकारणी दर - नवीन कर प्रणालीसाठी लागू
आकारणी | नवीन करप्रणाली २०२३ च्या अर्थसंकल्पापूर्वी (३१ मार्च २०२३ पर्यंत) | नवीन कर व्यवस्था अर्थसंकल्प 2023 नंतर (1 एप्रिल 2023 पासून) |
रु. ० - रु.२,५०,००० | -
| - |
रु.२,५०,००० - रु. ३,००,००० | ५% | - |
रु.३,००,००० - रु. ५,००,००० | ५% | ५% |
रु.५,००,००० - रु. ६,००,००० | १०% | ५% |
रु.६,००,००० - रु. ७,५०,००० | १०% | १०% |
रु.७,५०,००० - रु. ९,००,००० | १५% | १०% |
रु.९,००,००० - रु. १०,००,००० | १५% | १५% |
रु.१०,००,००० - रु. १२,००,००० | २०% | १५% |
रु.१२,००,००० - रु. १२,५०,००० | २०% | २०% |
रु.१२,५०,००० - रु. १५,००,००० | २५% | २०% |
>रु.१५,००००० | ३०% | ३०% |
नवीन कर प्रणाली विरुद्ध जुनी कर प्रणाली यांच्या कर आकारणी दरांमधील फरक
टीप:
ब. जुन्या कर प्रणालीसाठी आयकर आकारणी दर – आर्थिक वर्ष २०२२-२३ (एवाय २०२३-२४)
तुमचा वयोगट निवडा:६० वर्षांपेक्षा कमी
६० वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींसाठी आयकर आकारणी आणि HUF
आयकर आकारणी | 60 वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्ती – आयकर आकारणी |
रु. २.५ लाखा पर्यंत | शून्य |
रु. २.५ लाख - रु. ५ लाख | ५% |
रु. ५ लाख - रु. १० लाख | २०% |
> रु. १० लाख | ३०% |
टीप :
क. आर्थिक वर्ष २०२२-२३ (एवाय २०२३-२४) साठी आयकर आकारणी दर – नवीन कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली
आर्थिक वर्ष २२-२३ (एवाय २३-२४) साठी जुने कर प्रणाली आकारणी दर
रहिवासी आणि HUF | नवीन कर प्रणाली आकारणी दर
सर्व करदाते | ||||
आकारणी | < ६० वर्षे वय आणि अनिवासी भारतीय | > ६० ते ८० वर्षे | >८० वर्षे | २०२३ च्या अर्थसंकल्पापूर्वी
(३१ मार्च २०२३ पर्यंत) | अर्थसंकल्प २०२३ नंतर
(१ एप्रिल २०२३ पासून)
|
₹.० - ₹ २,५०,००० | शून्य | शून्य | शून्य | शून्य | शून्य |
₹ २,५०,०००- ₹ ३,००,००० | ५% | शून्य | शून्य | ५% | शून्य |
₹ ३,००,०००- ₹ ५,००,००० | ५% | ५% (८७ए अंतर्गत सूट) | शून्य | ५% | ५% |
₹ ५,००,०००- ₹ ६,००,००० | २०% | २०% | २०% | १०% | ५% |
₹ ६,००,०००- ₹ ७,५०,००० | २०% | २०% | २०% | १०% | १०% |
₹ ७,५०,०००- ₹ ९,००,००० | २०% | २०% | २०% | १५% | १०% |
₹ ९,००,०००- ₹ १०,००,००० | २०% | २०% | २०% | १५% | १५% |
₹ १०,००,०००- ₹ १२,००,००० | ३०% | ३०% | ३०% | २०% | १५% |
₹ १२,००,०००- ₹ १२,५०,००० | ३०% | ३०% | ३०% | २०% | २०% |
₹ १२,५०,०००- ₹ १५,००,००० |
३०% |
३०% |
३०% |
२५% |
२०% |
> ₹ १५,००,००० | ३०% | ३०% | ३०% | ३०% | ३०% |
ड. नवीन कर पद्धती स्वीकारण्यासाठी अटी
नवीन कररचनेमध्ये सवलत दर स्वीकारणाऱ्यांना सध्याच्या कर व्यवस्थेत उपलब्ध असलेले फायदे आणि सूट जाणून घ्यावे लागतील.एकूण ७० फायदे आणि सूट आहेत ज्यांना परवानगी नाहीये. सर्वात सामान्य खालील प्रमाणे आहे:
नवीन कर दर नियमांतर्गत सामान्य सवलती आणि कपातीची “अनुमती नसलेली” यादी
नवीन कर दर नियमांतर्गत “अनुमती असलेली” सवलतींची यादी
ई. नव्या कररचनेत कोणती कपात आणि सवलत दिली जाते?
नव्या आणि जुन्या कररचनेअंतर्गत उपलब्ध कपात आणि सवलत यांच्यातील तुलना पुढीलप्रमाणे आहे.
वैशिष्ट्ये | जुनी कररचना | नवीन करप्रणाली (३१ मार्च २०२३ पर्यंत)
| नवीन करप्रणाली (१ एप्रिल २०२३ पासून)
|
सवलत पात्रतेसाठी उत्पन्नाची पातळी | ₹ ५ लाख | ₹ ५ लाख | ₹ ७ लाख |
प्रमाणित कपात | ₹ ५०,००० | - | ₹ ५०,००० |
करमुक्त वेतन उत्पन्न | ₹ ५.५ लाख | ₹ ५ लाख | ₹ ७.५ लाख |
८७A अंतर्गत सवलत | १२,५०० | १२,५०० | २५,००० |
एचआरए सवलती | ✓ | X | X |
प्रवास भत्ता (एलटी ए) | ✓ | X | X |
अन्न भत्त्यासह इतर भत्ते ₹५०मध्ये प्रतिदिवस २ वेळेचे पोटभर जेवण | ✓ | X | X |
प्रमाणित कपात(५०,०००) | ✓ | X | ✓ |
मनोरंजन भत्ता कपात आणि व्यावसायिक कर | ✓ | X | X |
अधिकृत कारणांसाठी परवानग्या | ✓ | ✓ | ✓ |
कलम 24 बी अंतर्गत वैयक्तिक किंवा मोकळ्या मालमत्तेसाठी गृहकर्जावरील व्याज | ✓ | X | X |
लेट-आउट मालमत्तेवर कलम 24 बी अंतर्गत गृहकर्जावर व्याज | ✓ | ✓ | ✓ |
८०सी अंतर्गत कपात (ईपीएफ|एलआयसी|ईएलएसएस|पीपीएफ|एफडी|विद्यार्थ्यांची शिकवणी फी इ.) | ✓ | X | X |
एनपीएसमध्ये कर्मचाऱ्यांचे (स्वतःचे) योगदान | ✓ | X | X |
एनपीएसमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान | ✓ | ✓ | ✓ |
वैद्यकीय विमा हप्ता – ८०डी | ✓ | X | X |
दिव्यांग व्यक्ती – ८०यु | ✓ | X | X |
शिक्षण कर्जावरील व्याज – ८०ई | ✓ | X | X |
इलेक्ट्रिक वाहन कर्जावरील व्याज – ८०ईईबी | ✓ | X | X |
राजकीय पक्ष/संस्था इत्यादींना देणगी – ८०जी | ✓ | X | X |
८० टीटीए आणि ८०टीबी अंतर्गत सेव्हिंग्स बँक व्याज | ✓ | X | X |
इतर चॅप्टर VI–ए कपात | ✓ | X | X |
अग्निवीर कॉर्पस निधीतील सर्व योगदान – 80सीसीएच | ✓ | अस्तित्वात नाही | ✓ |
कौटुंबिक पेन्शनमध्ये सवलत | ✓ | ✓ | ✓ |
रु.५०,००० पर्यंतच्या भेटवस्तू | ✓ | ✓ | ✓ |
ऐच्छिक सेवानिवृत्ती १०(१०सी) वर सवलत | ✓ | ✓ | ✓ |
१०(१०) अंतर्गत ग्रॅच्युइटीवर सवलत | ✓ | ✓ | ✓ |
१०(१०एए)अंतर्गत रजेसाठी मिळणाऱ्या रोख रकमेवरील सवलत | ✓ | ✓ | ✓ |
रोजचा भत्ता | ✓ | ✓ | ✓ |
दिव्यांग व्यक्तींसाठी वाहतूक भत्ता | ✓ | ✓ | ✓ |
वाहतूक भत्ता | ✓ | ✓ | ✓ |
फ. जुनी कर व्यवस्था वि. नवीन कर प्रणाली यांचे उदाहरण आणि कोणती चांगली आहे?
जे मध्यम वर्गीय करदाते आहेत ज्यांचे 15 लाख रुपयांपर्यंतचे करपात्र उत्पन्न आहे, त्यांना नवीन करप्रणालीमुळे मोठा फायदा होऊ शकतो.जास्त उत्पन्न धारकांसाठी जुनी कर व्यवस्था हा उत्तम पर्याय आहे.
कमी गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी नवीन कर प्रणाली लाभदायक आहे. नव्या कररचनेनुसार सात कमी आयकर आकारणी करण्यात आल्या आहे, जो कर कपात न करता कर भरतो त्याला नव्या कर प्रणाली अंतर्गत कर भरण्याचा फायदा होऊ शकतो.उदाहरणार्थ, जर करदात्यांकडे १.९१ लाख रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक असेल आणि त्यांचे उत्पन्न १२ लाख रुपयांपर्यंतचे असेल तर त्यांच्यावर जुन्या प्रणालीअंतर्गत जास्त कर आकारला जाईल.आणि म्हणूनच जर तुम्ही कर बचतीच्या योजनांमध्ये कमी गुंतवणूक केली तर नवीन प्रणालीचा वापर करा.
असे म्हटले जाते की, कर बचतीच्या साधनांमध्ये गुंतवणूक करून जर तुमच्याकडे संपत्ती निर्मितीचा आर्थिक आराखडा असेल तर, मेडिक्लेम आणि जीवन विमा; मुलांच्या शिकवणी फी भरणे; , शिक्षण कर्जावरील ईएमआय भरणे, गृहकर्ज घेऊन घर खरेदी करणे आणि याप्रमाणे म्हणूनच जुनी कररचना तुम्हाला उच्च कर कपात आणि कमी कर सूट देण्यात मदत करतात.
वरील आणि नव्या आयकर पद्धतीच्या अनुषंगाने, जर करदात्यांनी सवलतीच्या कर दरांचा विचार केला तर ते दोन्ही पध्दतींचे मूल्यांकन करता येईल .त्यामुळे दोन्ही धोरणांमध्ये तुलनात्मक मूल्यांकन आणि विश्लेषण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि त्यानंतर सर्वात फायदेशीर निवडा प्रत्येक व्यक्तीनुसार ते वेगळे असू शकते. जुनी आणि नवीन कर प्रणालीची तुलना करण्यासाठी १० लाख उत्पन्न असलेले उदाहरण घेऊया.
मि. राहुल यांचे वेतन उत्पन्न रु. १० लाख आहे. ८०सी अंतर्गत ईएलएसएस,पीएफ, एलआयसी प्रिमियम आणि गृह कर्जाच्या मूळ हप्त्याअंतर्गत त्यांची एकूण गुंतवणूक 1.7 लाख रुपये आहे. शिवाय ते स्वत:साठी आणि पत्नीसाठी २८,००० रुपयांचा वैद्यकीय विमाही भरतात .जर त्यांनी जुन्या कररचनेचा पर्याय स्वीकारला तर त्यांना वरील कपातींचा दावा करता येईल, मात्र जर त्यांना या कपातींऐवजी नवीन कर प्रणाली हवी असेल तर या कपाती उपलब्ध होणार नाही.आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये त्यांनी गृह कर्जावर ७५,००० रुपये व्याज दिले आहे, चला आपण पाहू या की दोन्ही प्रणालींचा कर किती आहे.
वैशिष्ट्ये | जुनी कररचना (रु.) | नवी कररचना (रु.) |
एकूण कमाई | १,०००,००० | १,०००,००० |
कपात: | ||
८०सी अंतर्गत | १५०,००० | - |
८०डी अंतर्गत | २५,००० | - |
२४(बी) अंतर्गत | ७५,००० | - |
करपात्र उत्पन्न | ७५०,००० | १,०००,००० |
कर आकारणी (जुनी) | ||
० ते २.५ लाख | - | - |
२.५ ते ५ लाख @ ५% | १२,५०० | - |
५ ते ७.५ लाख @ २०% | ५०,००० | - |
>१०लाख @ ३०% | - | - |
कर आकारणी (नवीन) | ||
० ते ५ लाख | - | |
२.५ ते ५ लाख @ ५% | - | १२,५०० |
५ ते ७.५ लाख @ १०% | - | २५,००० |
७.५ ते १०लाख @ १५% | - | ३७,५०० |
१० ते १२.५ लाख @ २०% | - | - |
१२.५ ते १५ लाख @ २५% | - | - |
>१५ लाख @ ३०% | - | - |
आयकर | ६२,५०० | ७५,००० |
उपकर @ ४% | २,५०० | ३,००० |
एकूण कर कपात | ६५,००० | ७८,००० |
वर नमूद केलेल्या अनुसार, आयकर कायद्याच्या कलम 80c, 80 डी आणि 24(बी) अंतर्गत एकूण उत्पन्न 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास कर नियोजनाच्या दृष्टीकोणातून जुनी व्यवस्था अधिक फायदेशीर आहे. मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी 5 लाख रुपये उत्पन्न असून नवीन कर प्रणाली लाभदायक ठरू शकते.
ग. जूनी विरुद्ध नवीन प्रणाली पर्यायांच्या निवडीचा काळ?
उत्पन्नाचा प्रकार | जुन्या विरुद्ध नवीन प्रणाली पर्याय निवडण्याची वेळ |
वेतनातून मिळणारे उत्पन्न किंवा टीडीएस लागू असणारे दुसरे प्रमुख उत्पन्न | एक कर्मचारी नवीन कर प्रणालीची निवड करू शकतो आणि आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला याची माहिती आपल्या मालकाला द्या.कर्मचारी दर वर्षी कर प्रणाली निवडण्याचा पर्याय बदलू शकतात
तथापि, जेव्हा वर्षाच्या सुरुवातीला नवीन कर आकारणी आकारण्याचा पर्याय निवडला जातो, तेव्हा टीडीएस हेतूसाठी वर्षभरात कधीही बदल केला जाऊ शकत नाही, परंतु आयकर रिटर्न भरताना तो पर्याय बदलला जाऊ शकतो. |
व्यवसाय आणि पेश्यामधून मिळणारे उत्पन्न | व्यवसाय किंवा पेशाच्या उत्पन्नाच्या बाबतीत, विशिष्ट व्यवसायासाठी फक्त एकदाच कर प्रणाली निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. |
ह. देशांतर्गत कंपन्यांसाठी नव्या कर प्रणालीचे दर - आर्थिक वर्ष २०२२-२३
वैशिष्ट्य | आधीचे / जुने नियम कर दर | नवीन कर दर |
कंपनी कलम ११५बीएबी साठी निवड करते(कलम ११५बीए आणि ११५बीएए मध्ये समाविष्ट नाही)आणि १ ऑक्टोबर २०१९ नंतर किंवा त्यानंतर नोंदणी केली जाईल आणि ३१ मार्च २०२३ पर्यंत उत्पादन सुरू केले आहे. | - | १५% |
कंपनी कलम ११५बीएए साठी निवड करते ज्यामध्ये विशिष्ट कपात, इन्सेंटिव्ह्स, सवलती आणि अतिरिक्त अवमूल्यनचा वापर न करता कंपनीच्या एकूण उत्पन्नाची गणना केली गेली आहे. | - | २२% |
कंपनी १ मार्च २०१६ रोजी किंवा त्यानंतर कलम ११५बीए अंतर्गत नोंदणी करते आणि कोणत्याही वस्तूंच्या निर्मितीमध्ये व्यस्त असते कलम क्लॉजमध्ये नमूद केल्याप्रमाणे कपातीचा दावा करत नाही. | - | २५% |
वर्ष २०१८-१९ मध्ये कंपनीची वार्षिक उलाढाल किंवा एकूण जमा ४०० कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. | २५% | २५% |
इतर कुठलीही देशांतर्गत कंपनी | ३०% | ३०% |
*वरील सवलतीच्या रकमेवरील आयकर दरांची अंमलबजावणी तपासण्यासाठी कृपया नवीन विभाग पहा.
सर्व प्रकरणांमध्ये आयकर दायित्वात ४% दराने आरोग्य आणि शिक्षण अधिभार जोडला जाईल.
इ .भागीदारी संस्था किंवा एलएलपी साठी जुन्या/ नव्या पद्धतीनुसार आयकर दर
भागीदारी कंपनी / एलएलपी ३०% करपात्र आहे.
* 1 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना १२% अधिभार लागणार आहे.४% दराने आरोग्य आणि शिक्षण उपकर टीप- पुढील कर प्रणालीमध्ये कंपन्या/एलएलपींसाठी कुठलेही सवलतीचे दर उपलब्ध नाही.
३. आर्थिक वर्ष २२-२३ साठी आयकर आकारणी दर
अ. नवीन कर प्रणालीसाठी आयकर आकारणी
आयकर आकारणी | नव्या कररचनेतील आयकर आकारणी दर (सर्व व्यक्ति व HUF करीता लागू)
|
रु.०.० - रु.२.५ लाख | शून्य |
रु.२.५ लाख - रु.३.०० लाख | ५% (कलम ८७ए अंतर्गत कर सवलत) |
रु.३.०० लाख - रु.५.०० लाख | |
रु.५.०० लाख- रु.७.५लाख | १०% |
रु.७.५लाख - रु.१०.००लाख | १५% |
रु.१०.००लाख - रु.१२.५०लाख | २०% |
रु.१२.५लाख - रु.१५.००लाख | २५% |
>रु.१५.००लाख | ३०% |
नवीन कर प्रणाली विरुद्ध जुनी कर व्यवस्था यांच्यातील कर आकारणी दरांमधील फरक
टीप:
ब. जुन्या कर प्रणालीसाठी आयकर आकारणी दर –
तुमचा वयोगट निवडा:६० वर्षांपेक्षा कमी
आयकर आकारणी | 60 वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्ती – आयकर आकारणी |
रु. २.५ लाखा पर्यंत | शून्य |
रु. २.५ लाख - रु. ५ लाख | ५% |
रु. ५.०० लाख - रु. १० लाख | २०% |
> रु. १०.०० लाख | ३०% |
टीप :
क. देशांतर्गत कंपन्यांसाठी नव्या कर प्रणालीचे दर - आर्थिक वर्ष २०२२-२३ जुन्या/ नवीन कर प्रणाली नुसार
वैशिष्ट्य | आधीचे / जुने नियम कर दर | नवीन कर दर |
कंपनी कलम ११५बीएबी साठी निवड करते(कलम ११५बीए आणि ११५बीएए मध्ये समाविष्ट नाही)आणि १ ऑक्टोबर २०१९ नंतर किंवा त्यानंतर नोंदणी केली जाईल आणि ३१ मार्च २०२३ पर्यंत उत्पादन सुरू केले आहे. | - | १५% |
कंपनी कलम ११५बीएए साठी निवड करते ज्यामध्ये विशिष्ट कपात, इन्सेंटिव्ह्स, सवलती आणि अतिरिक्त अवमूल्यनचा वापर न करता कंपनीच्या एकूण उत्पन्नाची गणना केली गेली आहे. | - | २२% |
कंपनी १ मार्च २०१६ रोजी किंवा त्यानंतर कलम ११५बीए अंतर्गत नोंदणी करते आणि कोणत्याही वस्तूंच्या निर्मितीमध्ये व्यस्त असते कलम क्लॉजमध्ये नमूद केल्याप्रमाणे कपातीचा दावा करत नाही. | - | २५% |
वर्ष २०१८-१९ मध्ये कंपनीची वार्षिक उलाढाल किंवा एकूण जमा ४०० कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. | २५% | २५% |
इतर कुठलीही देशांतर्गत कंपनी | ३०% | ३०% |
*वरील सवलतीच्या रकमेवरील आयकर दरांची अंमलबजावणी तपासण्यासाठी कृपया नवीन विभाग पहा.
सर्व प्रकरणांमध्ये आयकर दायित्वात ४% दराने आरोग्य आणि शिक्षण अधिभार जोडला जाईल.
इ .भागीदारी संस्था किंवा एलएलपी साठी जुन्या/ नव्या पद्धतीनुसार आयकर दर
भागीदारी कंपनी / एलएलपी ३०% करपात्र आहे.
* 1 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना १२% अधिभार लागणार आहे.४% दराने आरोग्य आणि शिक्षण उपकर टीप- पुढील कर प्रणालीमध्ये कंपन्या/एलएलपींसाठी कुठलेही सवलतीचे दर उपलब्ध नाही.
४. आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी आयकर आकारणी दर
तुमचा वयोगट निवडा:६० वर्षांपेक्षा कमी
60 वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्ती आणि HUF साठी आयकर आकारणी
आयकर आकारणी | 60 वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्ती आणि HUF आणि अनिवासी भारतीय – आयकर आकारणी |
रु. २,५०,००० लाखा पर्यंत | शून्य |
रु. २,५०,००१ लाख ते रु. ५,००,००० लाख | ५% |
रु. ५,००,००१ लाख ते रु. १०,००,००० लाख | २०% |
रु. १०,००,००० लाखावर | ३०% |
टीप :
५. आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी आयकर आकारणी दर
तुमचा वयोगट निवडा:६० वर्षांपेक्षा कमी
६० वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्ती आणि HUF साठी आयकर आकारणी
आयकर आकारणी | 60 वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्ती आणि HUF – आयकर आकारणी |
एकूण उत्पन्न रु. २,५०,००० लाखा पर्यंत | कर आकारणी नाही |
एकूण उत्पन्न रु. २,५०,००० लाखापासून - रु. ५,००,००० लाख | ५% |
एकूण उत्पन्न रु. ५,००,००० लाखापासून ते रु. १०,००,००० लाख | २०% |
एकूण उत्पन्न रु. १०,००,००० लाखापेक्षा जास्त | ३०% |
टीप :
आता गुंतवा आणि करावर ₹ ४६,८०० ची बचत करा.
६. आर्थिक वर्ष २०१७-१८ साठी आयकर आकारणी दर
तुमचा वयोगट निवडा:६० वर्षांपेक्षा कमी
६० वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्ती आणि HUF साठी आयकर आकारणी
आयकर आकारणी | 60 वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्ती आणि HUF – आयकर आकारणी |
एकूण उत्पन्न रु. २,५०,००० लाखा पर्यंत | कर आकारणी नाही |
एकूण उत्पन्न रु. २,५०,००० लाखापासून - रु. ५,००,००० लाख | ५% |
एकूण उत्पन्न रु. ५,००,००० लाखापासून ते रु. १०,००,००० लाख | २०% |
एकूण उत्पन्न रु. १०,००,००० लाखापेक्षा जास्त | ३०% |
टीप :
आता गुंतवा आणि करावर ₹ ४६,८०० ची बचत करा.
७. आयकर आकारणीमधून आयकर कसा मोजावा?
रोहितचे एकूण उत्पन्न ८,००,००० रुपये आहे. हे उत्पन्न वेतन, मिळणारे भाडे, मिळणारे व्याज या सारख्या सर्वांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश करून मोजले आहे. कलम ८० अंतर्गत मिळणाऱ्या सवलतीही कमी करण्यात आल्या आहेत.रोहितला २०१८-१९(एवाय २०१९-२०१९) या आर्थिक वर्षासाठीची कर थकबाकी जाणून घ्यायची आहे.
आयकर आकारणी | कर दर | कर गणना |
एकूण उत्पन्न रु. २,५०,००० लाखा पर्यंत | कर आकारणी नाही | |
एकूण उत्पन्न रु. २,५०,००० लाखापासून - रु. ५,००,००० लाख | ५%(रु. ५,००,००० लाख - रु. २,५०,००० लाख) | रु. १२,५०० |
एकूण उत्पन्न रु. ५,००,००० लाखापासून ते रु. १०,००,००० लाखापर्यंत | २०%(रु. ८,००,००० लाख - रु. २,५०,००० लाख) | रु.६०,००० |
एकूण उत्पन्न रु. १०,००,००० लाखापेक्षा जास्त | ३०% | शून्य |
कर | रु.७२,५०० | |
उपकर | ७२,५०० च्या ४% | रु.२,९०० |
आर्थिक वर्ष २०१७-१८ मधील एकूण कर (एवाय २०१८-१९) | रु.७५,४०० |
*रोहित हा वैयक्तिक करदाता असून त्याला 2,50,000 रुपयांची आयकर सवलत आहे, याची कृपया नोंद घ्या.इतर करदात्यांसाठी म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि वरिष्ठ नागरिक, यांना कर सवलत प्राप्त करण्यासाठीची आयकर मर्यादा अनुक्रमे ३,००,००० आणि ५,००,००० रुपये असेल.
८. वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ's)
वर्ष २०२२-२३ साठी आयकर विवरणपत्र भरताना ना मला नवीन करप्रणाली निवडणे अनिवार्य आहे का?
नाही, नवीन आयकर प्रणाली ऐच्छिक आहे आणि कर भरणे सुलभ करण्यासाठी वित्त मंत्रालयाने ती सुरू केली आहे.करदात्याकडे एकतर नवीन कर प्रणाली निवडण्याचा किंवा जुनी कर प्रणाली वापरण्याचा पर्याय आहे.जर तुम्ही कर्मचारी असाल तर वर्षाच्या सुरुवातीला पर्याय निवडू शकता आणि पुढच्या वर्षी बदलू शकता.तथापि, व्यवसाय किंवा पेशामध्ये नवीन कर पद्धती निवडण्याचा पर्याय केवळ एकदाच उपलब्ध आहे.आम्ही तुम्हाला दोन्ही पध्दतींचा विचार करून करप्रणालीचे मूल्यांकन करण्याचा सल्ला देऊ आणि मग तुमच्यासाठी सर्वात जास्त लाभदायक जी आहे ती ठरण्याचा सल्ला देऊ.
८०सी कपातीचा दावा करून आणि मी नव्या आयकर प्रणालीचा पर्याय स्वीकारू शकतो का?
नाही, नव्या कररचनेमध्ये जुन्या किंवा आधीच्या कर व्यवस्थेत उपलब्ध असलेल्या अनेक कपाती आणि सवलतींना परवानगी नाही. नव्या नियमानुसार करदात्याने सवलतीच्या कर दरांचा स्वीकार केला असेल तर कलम 80सी अंतर्गत कपातींचा दावा करता येणार नाही.
मी आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी आयकर कसा मोजावा ?
आर्थिक वर्ष २०-२१ पासून, सरकार वैयक्तिक करदात्याला दोन कर प्रणाली पैकी, जुनी कर प्रणाली किंवा नवीन कर प्रणाली एक निवडून कर भरण्याची परवानगी देते.नव्या करप्रणालीमुळे व्यक्तीला इच्छा असेल तर जुनी कर प्रणाली वापरण्याचे स्वातंत्र्य मिळते. नवीन कर प्रणालीची निवड करताना, करदात्याला जुन्या कर प्रणालीमध्ये मिळणाऱ्या सवलती आणि कपाती सोडून द्याव्या लागतील ज्या जुनी कररचना निवडल्यास सुरु राहतील.नव्या कररचनेत ८० सीसीडी(२) अंतर्गत केवळ एक कपात आहे.म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत (एनपीएस) नियोक्त्याचे योगदान वार्षिक वेतनातून वजा केले जाते.जुन्या आणि नव्या दोन्ही पद्धतीनंमध्ये अडीच लाख रुपयांची मूलभूत सवलत दोन्ही प्रणालींना लागू आहे.
सरकार कर कसे गोळा करते?
सरकार तीन माध्यमांद्वारे कर गोळा करते- अ) करदात्यांनी विविध नियुक्त बँकांमार्फत ऐच्छिक रक्कम भरणे.उदाहरणार्थ, आगाऊ कर आणि स्व मूल्यांकन कर भरणा, ब)प्राप्तकर्त्याच्या उत्पन्नावरील कर कपात [टीडीएस] क)स्रोतावर जमा केलेला कर [टीसीएस].
आयकर आकारण्यासाठी किती कालावधी विचारात घेतला जातो?
आयकर कायदा (i)मागील वर्ष आणि (ii) मूल्यांकन वर्ष दर्शविते. व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नावर कर आकारला जातो.१ एप्रिलपासून सुरू होणार्या आणि पुढील वर्षांच्या ३१ मार्च रोजी संपणार्या कालावधीमध्ये कमावलेले उत्पन्न 'मागील वर्ष' म्हणून वर्गीकृत केले आहे.तर, मागील वर्षाच्या (१एप्रिलपासून सुरू होणारा आणि ३१ मार्च रोजी संपलेल्या वर्षाचा कालावधी) ‘मूल्यांकन वर्ष’ म्हणून निर्दिष्ट केला आहे.
उदाहरणार्थ, चालू मागील वर्ष १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ आहे, म्हणजे आर्थिक वर्ष २०२१-२२. संबंधित मूल्यांकन वर्ष १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ आहे, म्हणजे एवाय २०२२-२३.
चलनावर, कंपन्यांवरील आयकर आणि कंपन्यांव्यतिरिक्त इतर आयकर म्हणजे काय?
कंपन्यांनी त्यांच्या उत्पन्नावर जो कर भरायचा आहे त्याला कॉर्पोरेट कर म्हणतात, आणि तो भरण्यासाठी चलानमध्ये कंपन्यांवर आयकर (कॉर्पोरेशन कर )-००२० असा उल्लेख आहे.नॉन-कॉर्पोरेट करदात्यांद्वारे कर भरण्यासाठी, चलनामध्ये आयकर (कंपन्यांव्यतिरिक्त)-००२१ असा उल्लेख केला पाहिजे.
सर्व करदात्यांसाठी आयकर विवरणपत्र भरण्याची तारीख निश्चित आहे का?
नाही, सर्व करदात्यांसाठी देय तारीख समान नसते. वैयक्तिक करदात्यांसाठी देय तारीख मूल्यांकन वर्षाची 31 जुलै आहे.
आयटी कायद्यांतर्गत कलम ८७ अ अंतर्गत सवलत म्हणजे काय?
आयकर अधिनियम १९६१नुसार आयकर सूट देण्यासाठी ८७ए ही कायदेशीर तरतूद आहे.वित्त अधिनियम २०१३ अंतर्गत अंतर्भूत केलेल्या या कलमामुळे निश्चित मर्यादेपेक्षा कमी उत्पन्न होणाऱ्या व्यक्तींना कर सवलत मिळते. कलम ८७ ए नुसार भारतात राहणारे आणि ज्यांचे उत्पन्न ५,००,००० रुपयांपेक्षा अधिक नाही अशा व्यक्तींना सूट देण्याची तरतूद आहे.अशा प्रकारे एकूण करपात्र उत्पन्नाच्या 5 लाख रुपयांपेक्षा कमी रकमेवर व्यक्तींसाठी पूर्ण आयकर सूट उपलब्ध आहे.ही सवलत केवळ व्यक्तींना लागू आहे आणि कंपन्यांना नाही आणि ४% आरोग्य आणि शैक्षणिक उपकर जोडण्यापूर्वी मोजली जाते.
आयटी आकारणीचे दर कोण ठरवतात आणि ते बदलू शकतात का?
हो, आयटी आकारणीचे दर सरकार बदलू शकते. आर्थिक वर्षाच्या आयटी आकारणी दरांमध्ये बदल असल्यास ते त्या वर्षाच्या अर्थसंकल्पात सादर केले जातात आणि संसदेत सादर केले जातात.
विविध श्रेणींसाठी वेगवेगळ्या आकारणी आहेत का?
होय, ६० वर्षांखालील, ६० ते ८० वर्षे (ज्येष्ठ नागरिक) आणि ८० वर्षांवरील (वरिष्ठ नागरिक) वैयक्तिक करदात्यांसाठी स्वतंत्र आकारणी दर आहेत. तसेच भागीदारी कंपन्या, एलएलपी, कंपन्या, स्थानिक अधिकारी आणि सहकारी संस्थांसाठी कर दर वेगळे आहेत.
जर माझे वार्षिक उत्पन्न २.५ लाख पेक्षा कमी असेल तर मला आयकर विवरणपत्र भरावे लागेल का?
कर आकारणी अनेक घटकांवर अवलंबून आहे. यात वैयक्तिक आयकर सल्लागाराचा सल्ला घ्यावा.
आयकर विवरणपत्र ऑनलाइन कसे भरायचे?
तुमचे आयकर विवरणपत्र ऑनलाइन सबमिट करण्यासाठी, एकतर आयकर ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करा किंवा तुम्ही क्लिअरटॅक्सद्वारे देखील ई-फाइल करू शकता.आयकर पोर्टलद्वारे ई-फायलिंगसाठी, www.incometax.gov.in वर लॉग इन करा.तुम्ही ऑफलाइन json युटिलिटी डाउनलोड करू शकता आणि आयटीआर फाइल करू शकता.आयटीआर सबमिट करण्यापूर्वी किंवा आयटीआर भरल्यानंतर १२० च्या आत पडताळण्याचे लक्षात ठेवा.पडताळणीशिवाय आयटीआर अर्ज अपूर्ण आहे. आयकर ई-फायलिंग पोर्टलवर ई-फाइल आयटीआर कशी घ्यावी यासाठी कृपया येथे क्लिक करा.
भारतात किती उत्पन्न करमुक्त आहे?
आयकर कायद्यात करदात्यांसाठी मूलभूत मर्यादा निश्चित करण्यात आली आहे, ज्याअंतर्गत करदात्याला कर भरावा लागणार नाही.करदात्यांच्या विविध श्रेणींसाठी अशी मर्यादा वेगळी आहे.६०वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला २.५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही.६० वर्षांवरील परंतु ८० वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना ३ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही.८० वर्षांवरील व्यक्तींना ५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही.नव्या कर प्रणालीअंतर्गत येणाऱ्या सर्व व्यक्तींसाठी मूलभूत सवलतीची मर्यादा वय कितीही असले तरी २.५ लाख रुपये आहे.
आयकरावरील अधिभार कसा मोजवा ?
अधिभार हा करपात्र असतो. त्यामुळे उत्पन्नावर नव्हे तर करपात्र उत्पन्नावर अधिभार लावला जातो.उदाहरणार्थ, जर तुमचे उत्पन्न रु. १००० असेल तर रु.च्या ३०% करासह. ३००, जर उत्पन्न अधिभाराच्या अधीन असेल तर रु.च्या करावर १० % अधिभार लावला जाईल. ३००म्हणजे ३० रु.अधिभार वेगवेगळ्या दरांवर आकारला जातो म्हणजे एकूण उत्पन्न > ५० लाख असल्यास १०% आकारला जातो, एकूण उत्पन्न १ कोटीपेक्षा जास्त असल्यास १५%, एकूण उत्पन्न > २कोटी असल्यास उत्पन्नाच्या २५% आणि एकूण उत्पन्न 5 कोटींपेक्षा जास्त असल्यास ३७%.
आयकरासाठी ज्येष्ठ नागरिकाचे वय कसे मोजावे?
६० वर्षांवरील व्यक्ती ज्येष्ठ नागरिक म्हणून तर ८० वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती आयकराच्या उद्देशाने वरिष्ठ नागरिक म्हणून ओळखले जातात.ज्येष्ठ नागरिक आणि वरिष्ठ नागरिकांना काही दिलासा देण्यासाठी आयकर कायद्याद्वारे उच्च कर सवलत मर्यादा आणि विशिष्ट लाभ प्रदान करण्यात आले आहेत.
आयकर ऑनलाइन कसा भरावा?
आयकर ऑनलाईन भरण्यासाठी, कृपया nsdl.com वर लॉग इन करा.कृपया स्व मुल्यांकन कर भरण्यासाठी संबंधित चलन निवडा उदाहरणार्थ ‘चलान क्रमांक / आयटीएनएस २८०’ आणि पुढे जाण्यासाठी निवडा.एक विंडो उघडेल, "आयकर (कंपन्यांव्यतिरिक्त) म्हणून कर पे निवडा, पेमेंटचा प्रकार निवडा, पेमेंटचा प्रकार निवडा आणि पॅन, एवाय, पत्ता इत्यादी तपशील भरा.तुम्ही पुढे गेल्यावर, एक वेगळी विंडो उघडेल ज्यासाठी तुम्हाला नेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड वापरून पेमेंट करावे लागेल.पेमेंट पूर्ण झाल्यावर, पेमेंटचा पुरावा म्हणून एक काउंटरफॉइल प्रदर्शित केले जाईल. कृपया भविष्यातील संदर्भासाठी हे काउंटरफॉइल जतन करा.